भोकर :(रमेश गंगासागरे ) दि,18 जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या पुढे केंद्राने नव्यानेच आणलेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी भोकर येथील काँग्रेस राष्ट्रवादी एम. आय. एम. आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.

       नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मागील एका आठवड्यापासून मोर्चा व धरणे आंदोलन असल्याचा प्रसार करण्यात आला होता, पण पोलिसांनी मोर्चास परवानगी न दिल्याने आयोजकांनी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले, त्या अनुषंगाने आज 18 जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या पुढे भव्य पेंडॉल टाकून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती, या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जगदीश पाटील भोसीकर, रामचंद्र मुसळे, राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट शिवाजी कदम, एम.आय.एम. चे जुनेद पटेल, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान पठाण, नागोराव शेंडगे, माजी नगरसेवक गोंदवाले, शमीम इनामदार, यांच्यासह नांदेड वरून कार्यक्रमासाठी आलेले एम.आय.एम. चे कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, सदरील कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए. हिरे, नागोराव शेंडगे, बाबा खान पठाण यांनी केले होते. कार्यक्रमास असंख्य नागरिक उपस्थित होते.