भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर शहरातील विविध भागात गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी भोकर पोलिस स्टेशनच्या वतीने जागोजाग सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधार येऊन गुन्हेगारीत कमालीची घट झाली आहे.
भोकर पोलिस स्टेशनचा पदभार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी 1 वर्षापूर्वी घेतल्यापासून सर्व कर्मचारी अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत आहे, काही महिन्यांपूर्वी भोकरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांना ट्राफिक जाम मुळे पायी चालणे सुद्धा कठीण जात होते, या चौकात ऑटोचालकांच्या आणि किरकोळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे छोटे छोटे अपघात घडत होते, यावर आता पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी आपल्या अनुभव कौशल्याने तोडगा काढून येथील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, सोबत एका लाऊड स्पीकर ची सुद्धा सोय केली असून, त्यावरून कर्तव्यावर असलेला कर्मचारी कर्तव्य बजावत आहे की नाही, याची अनाउन्समेंट ते स्वतः करतात, तसेच एखादे वाहन रस्त्याच्या मध्यभागी थांबून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्यास, त्या वाहनाला काढण्याच्या सूचनाही कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला ते विनाविलंब देत असतात, तसेच चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने पोलीस स्टेशन कार्यालयात बसून सुद्धा चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. या सोबतच येथील चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चार होमगार्ड आणि तीन पोलीस नाईक यांची नियुक्ती करून मागील अनेक दिवसापासून वाहतुकीवर नियंत्रण मिळविले आहे, त्यामुळे या चौकातील वाहतुकीची कोंडी सुटल्याने नागरिक आता विनासायास मार्गक्रमण करत आहेत, त्यासोबतच छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक, लहुजी चौक, तहसील ऑफिस, रेस्ट हाऊस, सराफा गल्ली यासह भोकर शहरातील असंख्य भागात सीसीटीव्हीची गरुड नजर असल्याने कोणताही गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतून सुटणार नसल्याचे अनेक नागरिकांमधून बोलल्या जात आहे.
![]() |
| कंट्रोल रूम |
काही दिवसांपूर्वी भोकर उमरी रस्त्यावर वाहनांना अडवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या या घटनेचा छडा लावून त्यांनी अवघ्या दोन दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत तसेच भोकर शहरातील नागरिकांची पाळीव जनावरे रात्रीला चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा सुद्धा त्यांनी काही तासातच छडा लावून गजाआड केल्याने पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


1 Comments
सगळेच दिसत आहे पण गुटखा, मटका, क्लब, देशी,हे मात्र cctv कॅमेरा कॅच करत नाही.
ReplyDelete