भोकर : (रमेश गंगासागरे ) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी एका टिप्परने दिलेल्या धडकेत एका शाळकरी मुलासह इतर दोघे जण जखमी झाले आहेत.
भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अवैद्य वाहतुकीने कळस गाठला असून येथून शाळकरी मुला-मुली व नागरिकांना चालणे अत्यंत जिकरीचे झाले आहे, अशातच रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी आपल्या मुला व मुलींना घेऊन भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ रेड्डी हे खाजगी शिकवणी कडे जात असताना, पाठीमागून येणार्या एका टिप्परने त्यांना जोराची धडक दिली त्यात रितेश साईनाथ रेड्डी जखमी झाला तर त्याचे आई व पिता साईनाथ रेड्डी हे दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखमी झाले आहेत, दिवसेंदिवस ह्या चौकातील वाहतूक विस्कळीत होत असून खाजगी ऑटोचालक व फेरीवाले रस्त्यावरच थांबत असल्याने नागरिकांना चालणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे, याबाबत अनेक वेळा नागरिकांनी पोलिस प्रशासन व तहसीलदारांना निवेदन देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी विनंती केली होती, पण ह्यातही काही जास्त प्रमाणात फरक पडला नाही.
भोकर चौकातील अवैद्य वाहतूकीवर व इतर बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक भोकर यांनी चौकात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, या खेरीज वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी चार ते पाच पोलिस नायकांची नियुक्ती केलेली असतानाही अनेक ऑटोचालक व अवैध वाहतूक करणारी वाहने ह्या पोलिसांना न जुमानता रस्त्याच्या मधोमध वाहने अचानक थांबवत असल्याने दररोज याठिकाणी किरकोळ अपघात घडत आहेत, म्हणून आज दिनांक 3 डिसेंबर रोजी चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी शेकडो नागरिकांनी सह्यांचे निवेदन सादर करून भोकरच्या चौकात असलेले अवैध वाहनतळ इतरस्त्र हलवण्याची मागणी केली आहे, आता यावर पोलीस निरीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]() |
| हाच तो जखमी झालेला चिमुकला रितेश |


1 Comments
भोकर चौकात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित केली पाहिजे व तसेच Traffic सिग्नल बसवले पाहिजे.
ReplyDelete