नांदेड :(रमेश गंगासागरे ) नांदेड येथिल बहुजन चळवळीतील इंजी.चंद्रप्रकाश देगलूरकर आणि भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
         बुद्ध, बसवेश्वर, गुरू रविदास, फुले-शाहू-आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अभ्यासक, लेखक, परखड वक्ते, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष  सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, व इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांना शरण सेवा समिती लातूर यांच्या वतीने दिला जाणारा शरण साहित्य ग्रंथ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे, तर भोकर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने रविवारी सोनारी फाटा ता.हिमायतनगर येथे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पाटील जळगावकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न भवरे यांच्यासह मान्यवराच्या हस्ते पुरस्काराचे सन्मान पत्र व स्मृति चिन्ह देवून गौरव करण्यात आले आहे.