भोकर : (रमेश गंगासागरे ) राज्यातील शिवसेना भाजपच्या सरकारमूळे शेतकरी, विद्यार्थी, आणि सामान्य नागरिक परेशान असून शेती मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकऱ्या नाहीत, खिशात पैसा नाही, भारतात सगळीकडे मंदीची लाट चालू असल्याने पारले कंपनीने अनेक कामगारांना घरी बसवले आहे, अश्या बेजबाबदार सरकारला खाली खेचून घरी बसवा व विधानसभेत आमचे उमेदवार पाठवा, आम्ही सगळ्यांना योग्य न्याय देऊ असे ते म्हणाले. ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामदेव आयलवाड यांच्या प्रचार सभेत बोलत होते.


       आज दि,12 ऑक्टोबर रोजी भोकर येथील नवामोंढा येथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, मंचावर वंचित बहुजन आघाडीचे भोकर विधानसभेचे उमेदवार नामदेव आयलवाड, नायगाव विधानसभेचे उमेदवार मारोतराव कवळे गुरुजी, हदगाव विधानसभेचे उमेदवार, प्रा.रामचंद भराडे,ओबीसी नेते राजेश रापते, नागोराव शेंडगे,पुष्पाताई आयलवाड, भिमराव दुधारे, केशव मुद्देवाड, शिवराज बांगर,दशरथ भदरगे, ऍड.कमलेश चौदनते, भरती दिलीप राव, सुमेश फुगले, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, पुढे बोलतांना बाळासाहेब अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाण यांना म्हणाले की, भोकर विधानसभेत रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याने काही जण हेलिकॉप्टर ने हवेतून प्रचार करत आहेत, त्यांना आता पाच वर्षे हवेतच रहा म्हणून सांगा असे ते म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना पीजी पर्यंत मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असते, पण या सरकारला कधीच पाझर फुटला नाही, हे सरकार विद्यार्थ्यांसोबत योग्य न्याय करतांना दिसून येत नाही, अश्या बेसुमार वागणाऱ्या सरकारला विरोध करण्यासाठी आमच्यासारख्या तगड्या व प्रबळ माणसाची गरज आहे, आमचे सरकार जर राज्यात आले तर आम्ही विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांच्या शेती मालास पण योग्य भाव देऊ असे ते याप्रसंगी म्हणाले, यावेळी भोकर विधानसभेचे उमेदवार नामदेव आयलवाड आपल्या भाषणात म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या सारख्या वंचित, सामान्य व मागासवर्गीय माणसाला उमेदवारी देऊन सत्तेचे द्वार खुले केले आहे, या पक्षात जातीभेदाला थारा नाही. बाळासाहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापिही तडे जाऊ देणार नाही, तुम्ही मला विधानसभेत पाठवा तुमचे मत वाया जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले, प्रास्ताविक सुभाष तेले यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ कार्यकर्ते एल.ए. हिरे यांनी केले, तर आभार सुनिल भाऊ कांबळे यांनी केले, सभेस दमट वातावरणातही महिला व पुरुषांनी तुफान गर्दी केली होती हे विशेष आहे.