भोकर : (संदीप गंगासागरे ) 85,भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात श्री, पवन चांडक यांनी बोलाविलेल पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या बाबद मतदार संघातील तिन्ही तालुक्याची माहिती दिली आहे, सोबतच आदर्श आचार संहितेचे सर्वानी पालन करण्याचे त्त्यांनी आवाहन केले आहे.
भोकर मतदार संघातील मतदार यादीचे काम पूर्ण करण्यात आले असून या विधानसभेत भोकर, मुदखेड आणि अर्धापुर या तीन तालुक्याचा समावेश आहे, तीन तालुक्यात लोकसभेपेक्षा यावेळेस 3 हजार मतांची वाढ झाली आहे, या मतदारसंघात एकून 324 मतदान केंद्रे आहेत, तर भोकर तालुक्यात 130 मतदान केंद्रे असणार आहेत. 38 झोनल ऑफिसरसह एकूण 2198 कर्मचारी कर्तव्य बजावतील, तसेच मतदारसंघात 6 तृतीयपंथी यांनी वेगळी नोंदणी केली असून तेसुद्धा यावेळेस आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री पवन चांडक यांनी सांगितले आहे. वयोगटानुसार मतदार संख्या 18 ते 29 मतदार 7 हजार 352, 30 ते 39 मतदार 62 हजार 615, 40 ते 49 मतदार 57 हजार 153, 50 ते 59 मतदार 37 हजार 306, 60 ते 69 मतदार 22130, 70 ते 79 मतदार 11836, 80 ते 79 मतदार 69 65, 90 ते 99 मतदार 1471 अशी आहे.
![]() |
| पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी श्री, पवन चांडक व तहसीलदार श्री,भरत सूर्यवंशी माहिती देतांना |
अर्ज देने,अर्ज स्वीकार करणे,(सुट्टीचे दिवस वगळून) आणि अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून उमेदवारांनी इथे येऊन अधिकची माहिती घ्यावी असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे, कार्यालयाच्या दोन्ही बाजुचा 100 मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून उमेदवारासह पाच व्यक्तींना कार्यालयात प्रवेश दिला जाईल, भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत, तर नागरिकांसाठी आचारसंहिता भांगाची तक्रार असल्यास त्यांनी तालुक्यातील गटविकास अधिकारी (आचार संहिता प्रमुख) यांच्याकडे किंवा आपल्या मोबाईल मधून सिव्हिझील वरून थेट तक्रार करू शकतात. ड्राय - डे च्या दिवशी जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

2 Comments
Nice news in election
ReplyDeleteSave water immediately
ReplyDelete