भोकर :-रमेश गंगासागरे
शहरातील शांत आणि संयमी नागरिकांना येन केन मार्गाने त्रास देऊन आसुरी आनंद घेऊ इच्छिणाऱ्या काही उपटसुम्भ तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्या लोकांना जर वेळीच आवरले नाही तर युवा पिढी वाया जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील शांत आणि संयमी नागरिकांना येन केन मार्गाने त्रास देऊन आसुरी आनंद घेऊ इच्छिणाऱ्या काही उपटसुम्भ तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्या लोकांना जर वेळीच आवरले नाही तर युवा पिढी वाया जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
शहरात काही महिन्यांपासून सुसाट वेगाने मोटारसायकली पळवणे, बुलेट गाडीतून कर्णकर्कश फटाक्यासारखा आवाज काढणे, विना नंबरप्लेट ची गाडी वापरणे, मोटारसायकल लायसन्स न बाळगणे, केमिकल मध्ये भिजवून पिकवलेल्या फळांची विक्री करणे, बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करणे, झाडलेला कचरा रस्त्यावर तसेच दुभाजकात टाकून हवा आणि शहर दुर्गंधी युक्त करणे, आणि तरुणांना मटक्या सारख्या खेळात गुंतऊन त्यांचे आयुष्य बरबाद करणे अशे अघोरी प्रकार सध्या शहरात वाढले असल्याने तरुण पिढी बरबाद होतांना दिसून येत आहे.
जाणकारांच्या मते पूर्वी आंबा आणि केळी पिकविण्यासाठी भट्टी लावली जात असे, पण आता तात्काळ पैसे करण्यासाठी व्यापारी केमिकल मध्ये फळे पिकवत आहेत, त्यामुळे केमिकलचा वाईट परिणाम शरीरावर दिसून येत आहेत, डोळयांची आग होणे,नजर कमी होणे, अकाली केस गळणे, पोट बरोबर साफ न होणे, पचनशक्ती कमी होने, आणि अकाली वृध्द होणे असे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे अन्न व भेसळ अधिकाऱ्यानी भोकरकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे जाणकार नागरिक बोलत आहेत. शहरातील काही रोड लगतचे दुकानदार झाडलेला कचरा थेट रस्त्यावर टाकत आहेत, त्यामुळे नगरपरिषदेच्या स्वछता मोहिमेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे, काही तरुण मोटारसायकलीवर नंबर न टाकता नंबर प्लेटवर भाऊ, दादा पाटील, खान, पिंटू, चिंटू, टायगर अश्या उपाध्या लावत आहेत, त्यामुळे एखादा अपघात झाल्यास आणि नागरिकांना गाडीचा नंबर न दिसल्यास यास जबाबदार कोनास धरल्या जावे अशी विचारणा नागरिक करत आहेत, तर काही उपटसुंभ तरुण बुलेट गाडी सुसाट वेगाने पळवून गाडीतून फटाक्यासारखे आवाज काढत आहेत, त्यामुळे नागरिकांना कानाजवळ सुतळी बॉम्ब फोडल्यासारखे वाटत आहे, अश्या लोकांवर तात्काळ कारवाई करून शहर हवा प्रदूषण मुक्त करावे अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातून मटका आणि गुटखा सुद्धा तडीपार करून अश्या वाईट विकृतीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

1 Comments
चिंता नव्हेतर चिंतन करा हा भाव मनामनात रुजवतच जागरुकता वाढवण्यासाठीच बातमीपत्र वाचल.
ReplyDeleteएक टाका वेळीच घाला पुढचे अनेक वाचतील यासम आपल हे बातमीपत्र नव्हेतर,समाजहित जपणार पत्रच.
सरजी,
आपल्या समाजहित जपणार्य्या लेखणीसह विचारास सलाम!