भोकर : (संदीप गंगासागरे ) आजपर्यंत आपण येथील एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाचे अनेक किस्से ऐकले असतील, पण एका खातेदाराने दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी दिलेल्या रकमेच्या ऐवजी जर बँकेतील कर्मचाऱ्याने दहापट जास्तीची रक्कम ट्रान्सफर केली तर हे ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो.
याबाबत माहिती अशी की, भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक रमेश गंगासागरे हे नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांनी त्यांची परीक्षा फीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या खात्यात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रुपये 680/- ट्रान्सफर करण्यासाठी भोकरच्या एसबीआय बँकेत अर्ज केला त्यानुसार 680 रुपये ट्रान्सफर करणे अपेक्षित असताना येथील कर्मचाऱ्याने त्यांची दहा पट जास्त रक्कम म्हणजेच सहा हजार आठशे रुपये ट्रान्सफर करून नवा विक्रम केला आहे आपल्या खात्यातून रुपये 680/- ऐवजी सहा हजार आठशे रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज गंगासागरे यांना येताच त्यांनी बँकेत जाऊन येथील कर्मचारी आणि बँकेच्या मॅनेजरला धारेवर धरले, माझी पूर्ण रक्कम खात्यात परत आली पाहिजे आपण मी, अनुमती दिलेल्या रकमेऐवजी जास्तीची रक्कम ट्रान्सफर का केली आहे ? या प्रश्नाने त्यांना धारेवर धरले, तसेच बँकेच्या मॅनेजर कडून बँकेची चूक झाल्याचे लेखी पत्र तात्काळ लिहून घेतले, आणि जास्तीची गेलेली रक्कम परत खात्यात जमा करण्यासाठी खडे बोल सुनावले त्यावरून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली, मग काहीजण गंगासागरे यांची मनधरणी करू लागले तर काहीजण गेलेली रक्कम परत कशी आणता येईल याचे मार्गदर्शन वरिष्ठांना फोन करून घेऊ लागले, शेवटी बँक मॅनेजरने चार ते पाच दिवसात आपली रक्कम कोणतेही प्रयत्न करून आपल्या खात्यात परत आणून देऊ असे वचन दिल्याने गंगासागरे यांनी मॅनेजरच्या शब्दाचा मान ठेवून आंदोलन न करता काही दिवस थांबण्याचा विचार केला आहे.
काही महिन्यांपूर्वी नागापूर येथील एका कर्मचाऱ्याचे ह्याच बँकेतून त्या कर्मचार्याच्या खात्यातील पैसे अचानकपणे कपात करण्यात आले होते हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याचे सर्वश्रुत आहे, येथील कर्मचारी खातेधारकांना व्यवस्थित बोलत नाहीत, बँकेत पुरेशी जागा नाही, पासबुक वर इंट्री दररोज केल्या जात नाही या व अनेक समस्या भोकर येथील एसबीआय बँकेत नित्याचीच बाब झाली आहे तरी वरिष्ठांनी ह्या बँकेकडे तात्काळ लक्ष पुरवून तेथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी येथील असंख्य खातेधारक करत आहेत.

1 Comments
असच एक आपल प्रकरण आहे तीन महीन्यापासुन रक्कम दिले नाहीत
ReplyDelete