भोकर : (रमेश गंगासागरे ) 

        भोकर शहरात काही तरुण दुचाकी गाड्यांना कंपनीने दिलेले सायलेन्सर बदलून त्या जागी कर्णकर्कश व फटाक्या सारखे आवाजाचे सायलेन्सर बसवून तसेच धूम स्टाईलने गाड्या पळवून भोकर शहरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदर्शन करत आहेत.
        भोकर शहरातील काही तरुण मौजेखातर बुलेट गाड्यांचे सायलेन्सर बदलून टाकत आहेत आणि गर्दीच्या ठिकाणी व गल्लीबोळात गाड्या धूमस्टाईलने पळवून मोठे मोठे आवाज करत आहेत, त्यामुळे नागरिक ह्या मोठ्या आवाजाने एकदम दचकला जात आहे तर रात्रीसही ह्या गाड्या पळवण्याचे प्रकार चालू असल्याने लहान मुले झोपेतून दचकून उठत असल्याचे अनेक नागरिक बोलून दाखवत आहेत, अशा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या असंख्य गाड्यावर नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा दंड आकारून प्रशासनाने तरुणांना अद्दल घडवली होती,  आता नांदेडमध्ये अजिबात ध्वनिप्रदूषण नाही, त्याच प्रकारे भोकर शहरातही अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी आणि भोकर शहर ध्वनी प्रदूषण मुक्त करण्यात यावे अशी मागणी भोकर चे सुजान नागरिक करत आहेत.