भोकर :(रमेश गंगासागरे) तालुक्यातील धावरी बु. शिवारातील विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी निलगायीला वनविभाग व ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नाने वाचविण्यात यश आले आहे.
तालुक्यातील धावरी बु. शिवारात पाण्याच्या शोधात आलेली एक निलगाय (रोही) शेतकरी भाऊराव बाबा जाधव यांच्या शेतातील विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सरपंच बाबू राठोड यांनी येथील वनविभागास कळविल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी बी.एन. पेरलेवाड, वनरक्षक एस.ए.घोळवे, एम.एस. माळगे, एम.एम.धोतरे, तुकाराम किसवे, बाबू उल्लेवाड, उल्हास जाधव, उद्धव कोंडले यांचा सहभाग असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन निलगायीस काही तासातच सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले. वन कर्मचाऱ्यांना गावातील प्रभु जाधव, व्यंकटी जाधव, राजु जाधव, अरविंद जाधव, नारायण मोरे आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

1 Comments
Very good job and congratulations to all the team of forest department
ReplyDelete