आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजय मोरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या भोकर शहरातिल विविध खेडयात अवैद्य गिट्टी मशीन चालू आहेत. यात रायखोड, पोंमनाळा, चिंचाळा, खेडयाच्या आसपास असणाऱ्या या मशीन मुळे आणि त्यांच्या धूळी मुळे शेतीचे आणि विहिरीचे अतोनात नुकसान होत आहे. शेतात उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. व होत आहे. तसेच ब्लास्टिनगमुळे भूकंप झाल्याचा भास होत आहे, त्यामुळे बोअरवेलचे पाणी कमी होत आहे. व पान्याच्या मोटारी फसुन बसत आहेत. तर ज्या शेतकऱ्याना विहिरी आहेत, त्यांचे पाणी कमी होत आहे. तसेच ब्लास्टिनगच्या बारुदमुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुधा विपरीत परीनाम होत आहे.
त्यामुळे आपणास विनंती की, आपण प्रत्यक्ष गावकरी लोकाना विचारून व गावात येऊनु ग्रामसभा घेऊन ह्या अवैद्य मशीनी तात्काळ बंद कराव्यात. अन्यथा आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनामध्ये म्हटले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड आणि तहसीलदार भोकर यांना देण्यात आल्या आहेत.
0 Comments