भोकर : रमेश गंगासागरे 
शहरात काल सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास अचानक तुफान वाऱ्यांनी हजेरी लावली असून, संपूर्ण शहर जिल्हा आणि तालुक्यात धुळीचे वादळ उडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. 
     जोरदार वाऱ्यांमुळे रस्त्यांवर धूळ उडली असून त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी नागरिक महिला पुरुष दोघेही हैराण झाले होते तर तालुक्यातील आंबा फळभागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याचा जोर जास्त असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेल्या शेडचे पत्रे उडाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची झाडें उन्मळून पडली आहेत. उमरी येथिल महादेव मंदिराच्या आवारात असलेले पुरातन वडाचे झाड या वाऱ्याने पडले आहे. विशेष म्हणजे वाऱ्याचा वेग ताशी 50 km असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रेही उडाले आहेत तर शहरातील दुकानदाराचे बँनर ही उडून गेली आहेत.कुठे ही जीवित हानी झाल्याची नोंद नाही.