सध्या भोकर तालुक्यात गौण खनिज माफिया फोफावले असून तालुक्यात सगळीकडे शासनाची रॉयल्टी कमी भरून जास्तीचे ब्रास मुरूम उतखनन करून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी चुकवून वाहतूक करतआहेत. त्यामुळे अश्या गौण खनिज माफियावर ज्या ज्या ठिकानी उत्तखन चालू आहे त्या ठिकाणची गुगल मॅपिंग करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करावी या आशयांचे निवेदन पत्रकार गोविंद गिरी यांनी तहसीलदार यांना दिनांक : 24/04/2025, रोजी दिले आहे.
गोविंद गिरी यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की . भोकर तालुक्यातील मौजे भोसी, आणि चिदगिरी येथिल अवैद्य उत्खननाचे गुगल मॅपिंग करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करावी .
सध्या भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरूमाचे अवैद्य उत्खनन चालू आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयाची दिशाभूल करून हे भू-माफिया शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडवत आहेत. रॉयल टी कमी भरून जास्त मुरूमाचे उत्खनन करत आहेत. त्यामुळे आपणास विनंती की, उत्खनन ज्या भागात चालू आहे. त्या भागाची गुगल मॅपिंग करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करून मला या अहवालाची एक प्रत देऊन अवगत करावे. अन्यथा मला आपल्या कार्यालया समोर लोकशाही मागने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यास आपले कार्यालय जबाबदार राहील.
आता यावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी हे काय निर्णय घेतात हे पाहणेच योग्य ठरेल.
0 Comments