किनी तालुका भोकर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिवाकर रेड्डी यांची भाजपा भोकर तालुका अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
किनीच्या जिल्हा परिषद सर्कल मधून काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून प्रचंड बहुमताने निवडून येणारे दिवाकर रेड्डी हे तालुक्यातील पहिले उमेदवार होते त्यामुळे त्यांचा परिचय मुंबई ते दिल्ली पर्यंत पोहोचला. त्यांचे कार्य किनी सर्कलमध्ये महत्त्वपूर्ण असल्यामुळे तेथील जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले होते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अनेक वेळा अभिनंदनही केले होते. काहीदिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड येथे आले होते, तेव्हा मात्र ते दिवाकर रेड्डी यांना आवर्जून भेटले होते. नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अनेक बड्या नेत्यांचा नंबर लागलेला नव्हता. पण दिवाकर रेड्डी यांचा नंबर लागल्यामुळे जिल्हाभरात त्यांच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळेच अनेक राजकीय जाणकार मंडळी त्यांच्याविषयी भावी तालुकाध्यक्ष होतील असे भाकीत वर्तविले होते ते आता खरे ठरले असून एका कार्यक्रमात मुंबई येथे त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे दिवाकर रेड्डी यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे
0 Comments