मार्च महिन्यापासून भोकर शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असून अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे. अशातच नगरपालिकेने नागरिकांना आणि बाजार करण्यासाठी येणाऱ्या बाहेर गावच्या लोकांसाठी पिण्याचे पाणी सर्वजनिक नळ उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे खाजगी हॉटेलधारक याचा गैरफायदा घेऊन पिण्याच्या पाण्याची बॉटल अवाच्या संवाद दरामध्ये विक्री करताना दिसून येत आहेत. दरवर्षी हा प्रकार भोकर शहरामध्ये चालू असल्याकारणाने अनेक सामाजिक संघटना पुढे येऊन पानपोई स्थापन केल्या होत्या पण यावर्षी मात्र भोकर शहरांमध्ये कुठेच पानपोई ची स्थापना झालेली दिसून येत नाही. त्यामुळे खाजगी व्यावसायदार हे नागरिकांची लूट करताना दिसून येत आहे. जागोजाग शीतपे यांची दुकाने थाटले असून कोल्ड्रिंक्स विकत घेताना कूलिंग चार्ज वेगळा लावून सुद्धा नागरिकांची लूट करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटनांनी या बाबीचे भान ठेवून भोकर शहरांमध्ये थंड पाणी पिण्याचे उपलब्ध करून देऊन पानपोळीची स्थापना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0 Comments