परवा जमू काश्मीर मधील पहेलगाम या ठिकाणी सहलीवर येऊन निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्याऱ्या निष्पाप नागरिकांवर अमानुष हल्ला करून 27 च्या वर लोकांना ठार मारले, त्याचा भोकर जिल्हा नांदेड येथिल मुस्लिम बांधवा कडून निषेध व्यक्त. करण्यात आला असून या अमानवीय घटनेचा शुक्रवारच्या सामूहिक नमाज नंतर पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देऊन जाहीररित्या निषेध नोंदविण्यात आला.
जगभरामधून सदरील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला जात असून यामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता दिसून आली आहे. दहशतवाद्यांनी निष्पाप आणि निहत्यार नागरिकावर बेछूट गोळीबार केला आहे. अनेकांच्या पतीला डोळ्यादेखत मारले आहे भावी स्वप्न रंगवणाऱ्या नवरी समोर तिच्या पतीची निर्गुण हत्या केली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केल्या जात आहे. उद्या दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी भोकर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे हिंदू संघटनांनी आव्हान केले आहे. आज उमरी, नांदेड आणि काल मुदखेड कडकडीत बंद होते. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला उद्या अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
0 Comments