भोकर ते किनवट जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाहतूक, दुकानदाराने वाढवलेले अतिक्रमण, मोकाट जनावरे, बेशिस्त चालणारे ऑटो आणि रस्त्यात उभे असलेले रोड रोमिओ यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी व येण्यासाठी या सर्व बाबींचा सामना करून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शाळा व कॉलेजेस सुटण्याच्या वेळेत आणि भरण्याच्या वेळेत सदरील रस्त्यावर पोलीस बंदोबस्त द्यावा या आशयाची मागणी भोकर येथील श्री शाहू महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर यांनी उपविभागीय अधिकारी भोकर आणि पोलीस निरीक्षक भोकर यांना लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.
भोकर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन भोकर किनवट रोड आणि भोकर ते नांदेड रोड जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे, पण भोकर ते किनवट रोड कडे जाणाऱ्या रस्त्याची हालत मोठ्या प्रमाणावर खराब झालेली दिसून येत आहे, या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी सार्वजनिक नालीच्या बाहेर सुद्धा आपल्या दुकानातील माल भर रस्त्यावर लावलेला असतो, त्याच्यापुढे अवैद्य वाहतूक करणाऱ्या गाड्या, जीप आणि ऑटो उभ्या टाकलेल्या असतात, याच रोडवर खाजगी शिकवणी आणि इतर शाळा सुद्धा आहेत या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, यातच या रस्त्यावर लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, तसेच शाळा सुटल्यावर या वर्दळीचा फायदा घेऊन उभे असलेले रोड रोमिओ अनेकदा मुलींची छेड काढलेले प्रकरण घडलेले आहेत, अनेकदा या अवैध्य वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे अपघात झालेले आहेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर काहीजण अपंग झालेले आहेत, त्यामुळे शाहू विद्यालयाच्या वतीने अनेक वेळा प्रशासनाला निवेदने देऊन पोलीस कर्मचारी शाळा सुटण्याच्या वेळेत पाठवून सहकार्य करावे अशी विनंती सुद्धा करण्यात आली होती तरीसुद्धा अद्याप प्रशासनाने कसल्याच प्रकारचे सहकार्य केले नाही म्हणून परत 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे, जर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली नाही तर शेवटी प्राचार्य यांना आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा सुद्धा दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आला आहे. आता या निवेदनावर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे योग्य राहील.
0 Comments