भोकर : प्रतिनिधी 
भोकर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर निवासी राहत नसल्यामुळे रात्री अपरात्री आलेल्या रुग्णावर पुरेसे उपचार होत नसल्याने अशा रुग्णांना आपला जीव गमावा लागत आहे. या आशयाची तक्रार रुग्ण हक्क संरक्षण समितीने राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.
       भोकर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या लक्षणीय असून या ठिकाणी त्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे ही सर्व निवासस्थाने सर्व सोयींनी युक्त असे असूनही येथील अनेक डॉक्टर नांदेड ते भोकर दररोज येणे जाणे करत आहेत त्यामुळे दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला तात्काळ उपचार मिळत नाही अनेक रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्यात येत आहे या रुग्णांना भोकर येथे सर्व उपचार मिळावेत व येथील डॉक्टरांना निवासी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने विजयकुमार मोरे रूग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा उपाध्यक्ष, गंगाधर नक्कलवाड रूग्ण हक्क संरक्षण समिती नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, सौ.बनसोडे रूग्ण हक्क संरक्षण समिती नांदेड जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्षा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.