भोकर: रमेश गंगासागरे 
आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान रेल्वे गेट परिसरात चालणाऱ्या येका अवैध मटका बुक्कीवर दुपारी भोकर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मटका खेळवीत असताना तिघांना रंगे हाथ पकडुन त्यांच्याकडून 2620 रुपये रोख जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
       मागील अनेक दिवसापासून भोकर शहर व परिसरामध्ये धंद्यांनी डोक्यावर काढले होते याबाबत अनेक माध्यमांमधून बातम्या प्रकाशित होताच, आज भोकर पोलिसांनी धाडस दाखवून रेल्वे गेट परिसरातील मटक्याच्या बुक्कीवर धाड टाकून भोकर येथील तिघांना अटक केले, यामध्ये शेख मनान शेख रहीम, सिद्धोधन रामराव पाटील, सुरेश मोहन करे यांना अटक केली. पोलिसांची धाड पडताच इतर व्यक्ती पळून गेल्याचे ऐकविण्यात येत आहे. भोकर शहरामध्ये बसस्थानक परिसर, पंचायत समितीचा परिसर, विठ्ठल रुक्माई मंदिराचा परिसर या भागात सुद्धा मटक्याच्या बुक्क्या असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे या भागात सुद्धा पोलिसांनी अचानक धाडसत्र सुरू करावे, आणि भोकर शहर अवैध धंदे मुक्त करावे अशी मागणी भोकर शहरांमध्ये केली जात आहे.