भोकर : रमेश गंगासागरे
श्री श्री रविशंकर जी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपिनेस प्रोग्राम भोकर शहरात दिनांक ६ ते ११ या सहा दिवसाचा नुकताच उत्साहात पार पडला.
           त्या वेळी या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून नांदेड वरून आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरीष्ठ प्रशिक्षक आदरणीय राजेश्वरजी भुरे, सौ आरुणा भुरे, डॉ. विठल माने हे उपस्थित होते.
       योगा ,प्राणायाम ,ध्यान, क्रीडा, सुदर्शन क्रिया आणि स्वतःला नेहमी वर्तमानात कसे ठेवायचे, याचे प्रात्यक्षिक प्रदर्शन दिले. अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत नेहमी तणावमुक्त जीवन कसे जगावे, हे शिकविले या शिबिरास साधकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला.
        कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी शिबिरातील साधकांकडून गरजू लोकांना मायेची ऊब म्हणून मोतीनगर परिसरात ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सोपान तोटावाड, ,विठल कुमारे, दिलीप कावळे ,ओम सोमवंशी, आकाश गौड, संतोष उत्तरवार, बालाजी वाघमारे, यांनी पुढाकार घेतला.