तालुक्यातील मौजे मातुळ, रायखोड, चिदगिरी, आणि पोमनाळा या ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सोहेल यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे. चारही गावाचा पदभार एकाच ग्रामसेवकाकडे देण्यात आल्याने प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. वरिल चारही ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामा संदर्भात अनेकांनी अनेक वेळा तक्रारी व निवेदने देऊन सुध्दा गटविकास अधिकारी या प्रकरणाकडे काणाडोळा करत असल्याने ग्रामसेवकाचे मनोबल आणखी वाढत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा ग्रामसेवकांना ते पाठिशी घालत असल्याने तालुक्यात बोगस कामा विरोधात जाऊन तक्रारी व निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांना " बघून घेतो " सारख्या धमक्या देऊन, पैशाचे आमिष दाखवून, बोगस कामावर पांघरून घालून, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
वरील चारही ग्रामपंचायत अंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून अब्दुल सोहेल यांनी भोकर तालुक्यातील मौजे मातुळ. रायखोड, चिदगीरी, पोमनाळा इत्यादी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातील आलेल्या निधी मध्ये गावात दलित, वस्ती सह , जल शुध्दीकरण यंत्रकाम, गावात नाली बांधकाम, सी सी रोड, पाणी पुरवठा, समाज मंदिर, सोलार यंञ बसवने, यासह अनेक कामात ग्रामसेवक यांनी संगमत करून ? गावातील आदी कामे बोगस व निकृष्ट दर्जाची करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुन भ्रष्ट कामाची तत्काळ उच्चस्तरिय चौकशी करून चौकशीचा अहवाल देण्यात यावा अशी मागणी अब्दूल सोहेल अब्दूल मजीद यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार भोकर, यांच्याकडे देण्यात आल्या आहेत चारही ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्ट कामाची चौकशी होणार का ? याकडे गावातली ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकाच ग्रामसेवकाकडे एवढ्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा काय ? या बाबद गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, गावची मागणी असल्याने तसेच ग्रामपंचतीचा ठराव असल्या कारणाने ग्रामसेवकाना ग्रामपंचायती दिल्या आहेत, असे ते म्हणाले. पण अनेक ग्रामसेवकाच्या तक्रारी आल्यावरही गटविकास अधिकारी यांनी काहीच भूमिका घेतली नाही, असेही जनतेमधून बोलल्या जात आहे.
0 Comments