उमरी तालुक्यातील खेड्यापाड्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या वतीने दरवर्षी रोपे लावण्यात येतात पण मागील दोन वर्षापासून सदरील कार्यालयाच्या वतीने एकही झाड लावण्यात आले नसून कुठेच झाड जगलेले दिसून आले नाही, सदरील घटनेबाबत संबंधित कार्यालया कडून अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, उमरी शहरांमध्ये कुठेच संबंधित कार्यालय दिसून आले नाही, त्यामुळे सामाजिक वनीकरणचे हे कार्यालय हरवले असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
उमरी शहराच्या बाहेर माळरानावर गायरान पट्ट्या लागत रोपे लावण्यात आली असल्याची नागरिकाकडून माहिती मिळतात सदरील ठिकाण पाहण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेले असता त्यांना 1996 मध्ये गायरान पट्टे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये संबंधित विभागाच्या वतीने झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आल्याचे कळाले, मात्र ज्या ठिकाणी सरकारी गायरान जमिनी पडीत स्वरूपात पडलेली आहे अशा ठिकाणी एकही झाड लावण्यात आलेले दिसून आले नाही, ही गंभीर व चिंतेची बाब त्या ठिकाणी दिसून आली आहे. लाखो रुपये खर्च करून दरवर्षी हजारो रोपे लावण्यात येतात मात्र त्यापैकी एकही झाड जगत नाही ही चिंतेची बाब आहे. उमरी शहरांमध्ये संबंधित विभागाचे कार्यालय किंवा ठिकाण नसल्यामुळे सदरील कार्यालयाचे कर्मचारी हे नेहमीच इतरस्त्र बसलेले दिसून येतात, ज्या कार्यालयाचा वर्षाखाली लाखो रुपयाचा व्यवहार आणि करोडो रुपयाची उलाढाल आहे अशा कार्यालयास किरायाची इमारत मिळू शकत नाही ही तेवढीच गंभीर बाब आहे. लावलेली रोपे जगली काय आणि मेली काय ह्याकडे पाहण्यासाठी कोणताच कर्मचारी किंवा अधिकारी येत नाही उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार उमरी तालुक्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे संबंधित कार्यालयाचे उपविभाग कार्यालय उमरी येथे करून दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा आणि सरकारी गायरान जमिनीवरच रोपे लावण्यात यावीत अशी मागणी उमरी तालुक्यातील सुजाण नागरिक करत आहेत.
0 Comments