भोकर : रमेश गंगासागरे
भोकर येथील तालुका कृषि कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून मागील 10 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आता शेतकऱ्यांना या कार्यालयात जातांना खूप त्रास होतो आहे.
     तालुक्यात दरवर्षी सगळीकडे रस्त्यांची लांबलचक कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असते, यासाठी मोठा निधी पण शासन देत असतो, यातूनच मोठी कामे केली जातात, शहरापासून अगदी जवळ असलेले हे तालुका कृषी कार्यालय दुर्लक्षित कसे राहिले, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, या कार्यालयातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनेची इत्यम्भूत माहिती दिली जाते, व या ठिकाणी साहित्य घेऊन अनेक जड वाहने येत असतात, ही वाहने रस्त्यात फसून बसत आहेत, आता अनेक शेतकरी बांधव पीक विम्याच्या तक्रारी घेऊन या ऑफिस ला भेटी देत आहेत, पण जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने दुकाकीवरून पडत आहेत, अश्या एक ना अनेक स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत, म्हणून बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष पुरवून ह्या रस्त्यावर तात्काळ डाम्बरी करण करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.