भोकर : रमेश गंगासागरे
 कुटुंब नियोजन पध्दतींचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून मागील अकरा वर्षापासून राज्यामध्ये “ जागतिक लोकसंख्या दिन ” साजरा करण्यात येत आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे ऐवढयापुरता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार दि.११ जुलै हा एक दिवस “ जागतिक लोकसंख्या दिन " म्हणून साजरा करावयाच्या ऐवजी यावर्षीही दोन टप्यात साजरा करावयाचा आहे. पहिला टप्पा “ दांपत्य संपर्क पंधरवडा २७ जुन ते १० जुलै २०२२ " या कालावधीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्व पटवून देण्याकरिता समाजात जनजागृती व संवेदीकरण करण्यात येणार आहे आणि दुसरा टप्पा “ लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २४ जुलै २०२२ " या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाच्या सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. जागतिक लोकसंख्या दिनाचे यावर्षीचे घोष वाक्य " स्वीकारा कुटुंब नियोजनाचा उपाय,लिहा प्रगतीचा नवा अध्याय " जागतिक लोकसंख्या दिनाचा हा कार्यक्रम राज्यामधील सर्व जिल्हयात राबविण्यासाठी केंद्र शासनाने मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत, दांपत्य संपर्क पंधरवडा ( Mobilization Fortnight ) - दि.२७ जुन ते १० जुलै २०२२ : संकल्पना : कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पध्दती व सेवा याबाबतच्या माहितीचा समाजात प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रे वृत्त वाहिन्या तसेच इतर डिजीटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करावी. माहितीचा प्रचार व प्रसार करताना लग्नाच्या वेळीचे वय लांबविणे, दोन बाळांच्या जन्मांमध्ये पुरेसे अंतर, प्रसूती पश्चात/गर्भपात पश्चात कुटुंब नियोजन पध्दतीचा अवलंब व कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग याबाबींचा प्रामुख्याने प्रचार व प्रसार करण्यात यावा. ' कुटुंब नियोजनाच्या विविध पध्दतींचा व सेवांचा तसेच सदर पध्दती/ सेवा सर्व शासकिय आरोग्य संस्थेत उपलब्ध असल्याबाबत विविध प्रभावी प्रसार माध्यमांचा वापर करून प्रचार व प्रसार करावा. जिल्हा,तालुक्यामध्ये गावोगावी कुटुंब नियोजन सेवांची माहिती देण्यासाठी मोबाईल व्हॅनचा उपयोग करण्यात यावा. 
आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली येथे बाह्य रुग्ण विभागात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र जमवून सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व संतती नियमांचे साधन बाबत माहिती दिली. 
यावेळी डॉ अनंत चव्हाण भुलतज्ञ, डॉ सागर रेड्डी, डॉ. थोरवट,बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, साबेर पाशा, श्रीमती भालेराव, पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी , विजय क्षीरसागर, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र, बडेलू व नागरिक उपस्थित होते.