■ रेणापूर येथील 10 कुटुंब स्थलांतरित.
■ शेतीचे प्रचंड नुकसान.
■ जिकडेतिकडे पाणीच पाणी.
सतत 3 दिवसापासून पडणाऱ्या पावसाने तालुक्यात सगळीकडे हाहाकार माजवला असून बोरगाव आणि धानोरा या 2 खेड्यांचा सध्या संपर्क तुटल्याचे व रेणापूर येथील 10 कुटुंबातील 33 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याचे, तहसील प्रशासणाने कळविले आहे.
मौ. रेणापूर या गावात पुराचे पाणी शिरत असल्याने पुराच्या पाण्यालगत असलेल्या 10 कुटुंबातील एकूण 33 जणांना सुरक्षित स्थळी (जिल्हा परिषद शाळेत) स्थलांतरित केले आहे. त्यामुळे आता जीवितहानीची शक्यता नाही, स्थलांतरित केलेल्या लोकांची आवश्यक लागणारी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कामी कोतवाल श्री. राहुल कदम यांची मदत झाली आहे. तसेच गावातील पोलीस पाटील श्री. सूर्यवंशी व स्वस्त धान्य दुकानदार श्री. अनिल बिरगाळे यांची पण खूप मोलाची मदत झाली आहे.(पुराचे पाणी गावात शिरत आहे, याबाबत संबंधित तलाठी श्रीमती राधा खुळे यांनी तात्काळ माहिती दिल्यामुळे पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्यात आली असल्याचे प्रशासणाने कळविले आहे. तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे कळते. हवामान खात्याने सांगितल्यानुसार आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज दि.13 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद रहाणार आहेत.
0 Comments