भोकर :(दि.10 )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील नांदा येथील महिला सरपंच सविताबाई आबना दायलवाड आणि तिचे पती आबना विठ्ठल दैलोड (धंदा शिक्षक) या दोघांना आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये लाच घेताना रंगेहात पकडल्याने भोकर तालुक्यातील  सरपंचा मध्ये खळबळ माजली आहे.
       
सध्या भोकर तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ पातळीवरून निधी प्राप्त झाला आहे, उपलब्ध निधीच्या मार्फत अनेक ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीने कामे होत आहेत, तर बहुतांश ग्रामपंचायती मध्ये कामे थातुरमातुर करून शासनाच्या निधीला  हरताळ फासण्याचे कार्य चालू असल्याचे चित्र भोकर तालुक्यामध्ये दिसत आहे.  सदरील ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीच्या कामासाठी सरपंच आणि तिचे पती यांनी काम करणाऱ्या गुत्तेदारास टक्केवारी द्यावी लागते असे म्हणून केलेल्या सरकारी कामाचे 13 लाख 40 हजारांचे 1 लाख तीस हजार रुपयांच्या ( 22% प्रमाणे ) लाचेची मागणी केली होती, आणि आपण महिला असूनही लाचेची मागणी करन्यात काही कमी नसल्याचे दाखवून दिले, गुतेदारास सरपंचताईला पैसे देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी नांदेड येथिल लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन रितसर फिर्याद दाखल केली होती,त्या अनुषंगाने आज दुपारी त्यांना पंचासमक्ष लाच रुपये 50 हजार (पहिला हापता ) घेतांना रंगेहात पकडण्यात आले असून तात्काळ अटकही करण्यात आली आहे. अटक करून त्यांना भोकर ठाण्यात आणून त्यांच्यावर भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.
           (हीच ती स्मशान भूमी) 
 सरपंच ताईला आणि त्यांचे प्रतिनिधी शिक्षक पती यांना लाच घेतल्याने अटक होताच संबंध नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उद्या या दोघांना कोर्टापुढे हाजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.