भोकर :(दि.8 जून )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील अनेक भागात व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या हद्दीत आणि कार्यक्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी होत आहे, म्हणून उपविभागीय अधिकारी श्री,राजेंद्र खंदारे यांनी अवैद्य गौण खनिज चोरणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी गस्ती व भरारी पथकाची निर्मिती केली असून ह्या पथक दिवसा व रात्री फिरून धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असल्याने गौण खनिज चोरी करनाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
दिनांक 07/06/2022 रोजी रात्री 1.50 वाजता पथक प्रमुख श्रीमती रेखा चामनर (नायब तहसीलदार, भोकर) यांनी पथकातील सदस्य श्री. पंजाबराव मोरे (तलाठी) व वाहन चालक श्री. सुदाम माळझरकर यांनी
वाहन क्रमांक : MH26, BD5501
वाहन मालक, भिमराव माधवराव लोंढे, रा. सिडको, नांदेड यांचे वाहन जप्त करून
या हायवावर दंडात्मक कार्यवाही केली. व वाहन तहसील कार्यालय भोकर इथे आणून लावले असून या हायवा वाहनात 5 ब्रास रेती साठा मिळून आला आहे.
0 Comments