भोकर :( 17 जून 2022 )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील मौजे पोमनाळा सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून या सोसायटीवर काँग्रेस प्रणित केशव पाटील सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विरोधकांच्या गटाचा धुव्वा उडवत स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
ग्रामपंचायत कार्यालय पोमनाळा येथे मागील वर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये केशव पाटील सोळंके यांच्या गटाचा थोडक्यात पराभव झाला होता, त्यामुळे केशव पाटील सोळंके हे खचून न जाता मोठ्या जिद्दीने ते नागरिकांची कामे करत राहिले, तसेच नागरिकांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता, त्यामुळेच काल दिनांक 15 जून रोजी झालेल्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये त्यांनी शेतकरी विकास पॅनल काँग्रेस प्रणित पॅनल तयार करून निवडणूक लढवली आणि त्यांचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले, त्यामुळे या सर्वांचे सर्वस्थरातून अभिनंदन केले जात आहे.
■ सर्वसाधारण गटातून
1) गागलेवाड बाबुराव विठ्ठल, 2) जाधव रतन फकिरा
3) बोईनवाड चंद्रकांत पिराजी, 4) सूर्यवंशी रामदास राघोजी, 5) सोळंके केशव माधवराव, 6) सोळंके दत्तात्रय रामदास, 7) सोळंके विजय दत्तराम, 8) सोळंके शिवाजी पुंडलिक.
■ महिला राखीव गटातून
1)मुत्नेपवाड अनुसयाबाई रघुनाथ, 2)सोळंके शकुंतला बाई रघुनाथ
■ इतर मागासवर्गिय गटातून
1) बच्चेवाड साईनाथ सटवाजी
■ अनु. जाती/ जमातीमधून
1) मोरे भिमराव लक्ष्मन
■ भटक्या विमुक्त जाती मधून
1) राठोड दशरथ भिजू
0 Comments