भोकर:(दि.16 जून 2022 )
रमेश गंगासागरे
तालुक्यातील धानोरा येथे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकुर (घुगे), उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी बुधवार दि.15 रोजी भेट देऊन ग्रा.प.विकास कामांचा आढावा घेउन गावकऱ्याशी चर्चा केली.
प्रथम सरपंच सौ.वंदनाताई कर्पे, ग्रा.प.सदस्या सौ.लामगे, उपसरपंच रामराव कोंगेवाड,ग्रा.प.सदस्य यांनी वर्षाताई ठाकुर, नामदेव केंद्रे, अमित राठोड यांच्यासह अधिकारी यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. ग्रामसेवक अरविंद मुनगे यांनी ग्रा.प.च्या कामकाजा बाबद माहिती विषद केली या नंतर ठाकूर मॅडम यांनी गावाच्या विकास कामांबाबत गावकऱ्याशी संध्याकाळी उशिरापर्यंत संवाद साधला व चर्चा केली. विवीध कामांच्या बाबतीत अधिकारी यांना सुचना करत ग्रा.प.नुतन बांधकाम, अंगणवाडी, जुणी शाळा बांधकाम या नुतन ईमारती बांधकाम नीधी व स्मशानभूमी परिसर सुसज्ज करणे, सभागृह, रोड दुतर्फी झाडे लावणे व ईतर विकास कामे करण्यासाठी सरपंच व गावकऱ्याना आश्वासीत केले.
या प्रसंगी विस्तार अधिकारी श्री निलेश काळे, श्री शेटवाड, श्री अभय नरवाडे, श्री राठोड, मा.सरपंच राजेश कर्पे, ओबिसी नेते नागोराव शेंडगे, श्रीनिवास लामगे, कैलास राठोड, देविदास हामंद, प्रल्हाद हामंद, अंगणवाडी सेविका, मदतनिस, यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments