भोकर:(दि.13 जून 22 ) 
     रमेश गंगासागरे
सुरेश पाटील हे सर्व नागरिकांना सोबत घेऊन चालणारे, सर्वांच्या सुख दुःखात सामील होणारे, सर्वा सोबत मिळून-मिसळून राहणारे व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविणारे कार्यकर्ते म्हणून सुरेश पाटील डुरे सायाळकर यांच्याकडे पाहिले जाते, त्यांना मानणारा वर्गही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून त्यांना भोकर काँग्रेसचे अध्यक्ष करावे अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे.
         राष्ट्रीय काँग्रेसचे भोकर तालुक्याचे तालुका अध्यक्ष पद मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याकारणाने ते पद आता रिकामे न ठेवता सायाळ येथील श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचे कट्टर समर्थक व हितचिंतक श्री सुरेश पाटील डुरे सायाळकर यांना देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व  नागरिकांमधून केली जात आहे.
     त्यांचे वडील कै. शंकररावजी चव्हाण यांचे हितचिंतक होते, तर आता सुरेश पाटील हे श्री अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत, पुराण काळापासून हे घराणे चव्हाण साहेबांचे चाहते राहिले आहेत, सुरेश पाटील हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय कार्यकर्ते म्हणून राहत असल्याने तालुक्यातील प्रत्येक खेड्यात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. म्हणून तालुक्यातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांना तालुका अध्यक्ष पद मिळावे यासाठी मागील अनेक दिवसापासून प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. आमच्या प्रतिनिधींनी तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांकडून तालुका अध्यक्षपदासाठी आढावा घेतला असता, अनेक कार्यकत्यांनी सुरेश पाटील यांना पसंती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात भोकर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ सुरेश पाटील सायाळकर यांच्या गळ्यात पडेल अशी आशा सुरेश पाटील यांच्या चाहत्या वर्गातून व्यक्त केली जात आहे. चव्हाण साहेबांचे समर्थक असल्याकारणाने अनेक विरोधकांनी त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी अनेक प्रकारचे आमिष दाखवले पण त्या आमिषाला बळी न पडता सुरेश पाटील हे एक निष्ठेने आज पर्यंत काँग्रेसचे कार्य करत आलेले आहेत, त्यामुळे भोकर तालुक्याचे अध्यक्षपद देऊन त्यांच्यावर काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी टाकावी अशी मागणी भोकर तालुक्यातील कॉंग्रेसचे  कार्यकर्ते आणि नागरिक करतांना दिसून येत आहेत.