भोकर :(दि.12 जून )
  रमेश गंगासागरे
     मागील दोन दिवसांपासून भोकर शहरात शुल्लक कारणावरून तणाव निर्माण झाला असल्याने आज दिनांक 12 जून रोजी 11:30 वाजता भोकर पोलीस स्टेशन मध्ये सर्वपक्षीय शांतता कमिटीचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांनी केले होते.
       या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना अप्पर पोलिस अधीक्षक श्री विजय कबाडे सर म्हणाले की, भोकर शहरामध्ये मागील बारा वर्षापासून शांतता कायम असून ही शांतता भंग करण्याचे काही नागरिक प्रयत्न करताहेत काही दिवसा नंतर भोकर नगर परिषदेची निवडणूक लागणार असल्याने असे प्रकार घडत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला, त्यामुळे त्यांनी भोकर मध्ये गढूळ राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना खडेबोल सुनावत म्हटले आहे की, भोकरची शांतता अबाधित होती आणि अबाधित राहणार ही शांतता भंग करणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपून टाकिन, अर्धापुर मध्ये मी माझ्या कार्याची चुणूक दाखवली आहे, भोकर मध्ये वेगळे काही दाखवण्याची गरज पडू देऊ नका, अशा शब्दात त्यांनी शांतता कमिटी मध्ये सांगितले, या बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, तर शांतता कमिटीमध्ये भोकर शहरातील अनेक व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार आणि हिंदू मुस्लिम मधील विविध संघटनेचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शांतता कमिटी मध्ये पोलिस निरीक्षक श्री विकास पाटील म्हणाले की, भोकर शहरांमध्ये दोन दिवसात तीन घटना घडल्या असून ह्या तिन्ही घटनेमधील आरोपीची नावे निष्पन्न झाले असून लवकरच ते आमच्या ताब्यात असतील, कोणीही भोकरची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, आफवावर विश्वास ठेवू नका, सामाजीक सलोखा राखा,  पोलीस तुमच्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यापारी वर्गाला दिला, भोकरची शांतता अबाधित ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये श्री, प्रा.व्यंकट माने भगवान दंडवे, शिवाजी पाटील किन्हाळकर, भोकरचे माजी नगरसेवक मकसूद भाई गोंदवले, प्रशांत पोपशेटवार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस गणेश कापसे, सुभाष पा. किन्हाळकर मौलाना मोबीन भाई इनामदार माधव पाटील वडगावकर, माजी नगरसेवक शेख वकील भाई, डांगे, हामीद पठाण, ताहेर बेग, व्यापारी मुंदडा शेठ, गजानन अडकीने, यांची उपस्थिती होती.