रमेश गंगासागरे
दोन दिवसापासून भोकर शहरात तणावपूर्ण शांतता कायम असून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युवकास भोकर पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे आज हजर केले असता न्यायालयाने त्या युवकास जामिनावर न सोडता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संबंध भारतभर दिसत असून काल दिनांक 10 जून रोजी भोकर शहरातील एका विद्यार्थ्याने जातीय तेढ निर्माण करणारी अशीच पोस्ट फॉरवर्ड केल्यामुळे त्याच्यावर भोकर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक झाली होती, त्यानंतर रात्रीस काही जमाव रागाच्याभरा मध्ये जाऊन त्याचे वडील बसत असलेली शिवाजी चौकातील मेडिकल दुकान जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्या मेडिकलचे कागदपत्रे व सामान जळून 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद अडकिने यांनी दिली आहे, भोकर पोलिसांनी याबाबत सुद्धा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
◆ किराणा दुकान मालकास जबर मारहाण
जातीय तेढ निर्माण केलेल्या व दुकान जाळलेल्या घटनेवरून शहरात तणाव निर्माण झाला होता, हे वातावरण शांत होत असतांनाच आज दिनांक 11 जून रोजी दुपारी शिवाजी चौकातील सुरेश दमकोंडवार यांच्या किराणा दुकानात शिरूर तीन ते चार जणांनी सुरेश दमकोंडवार यास व इतर एकास जबर मारहाण करून, दगडफेक केली, त्यामुळे किराणा दुकान मालक यांचे डोके फुटले असून एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे कळते,
◆ आज शनिवारी मुस्लिम व्यापाऱ्यानी दुकाने बंद ठेवून केला निषेध, तर हिंदूंच्या संघटनेचा सोमवारी भोकर बंदचा इशारा.
दरम्यान शहरांमध्ये उद्भवलेल्या या विपरीत घटनेचा मुस्लीम व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला, यास मुस्लिम व्यापार्यांनी 100% प्रतिसाद दिला असल्याने हॉटेल, कापड दुकान, भांडी दुकान, किराणा दुकान , हात गाडी, फळ विक्रेते हे शांततेत शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले.
मेडिकल दुकान जाळणाऱ्या व किराणा मालकास मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, व कठोरात कठोर शासन करावे अन्यथा उद्या येणाऱ्या सोमवारी भोकर बंद ठेवणार असल्याचे निवेदन पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांना भोकर व भोकर तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांनी व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दिले आहे.
◆ शांतता पाळण्याचे भोकर पोलिसांनी केलेले आवाहन
भोकर शहरात एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटनेमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील हे परिस्थिती हाताळत असून त्यांनी गुन्हेगारांना कोणत्याही क्षणी माफ करणार नसल्याचे वक्तव्य शिष्टमंडळाला दिले आहे. नागरिकांनी सुद्धा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हाट्सॲप ट्विटर सारख्या सोशल मीडियावर न टाकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
0 Comments