भोकर :(रमेश गंगासागरे )
नांदेड जिल्हा परिषद निवडणूक व भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित पडलेल्या भोकर तालुका अध्यक्ष पदासाठी येत्या 10 जून रोजी शुभमुहूर्त लागणार असल्याची चर्चा असून याच दिवशी निवड निश्चित करण्यात येणार असल्याने या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासाठी अख्या भोकर तालुक्याचे लक्ष लागले आहे. मागील तालुका अध्यक्षांचा काळ संपून बरीच वर्षे लोटली तेंव्हा पासून येथील अध्यक्षपद रिकामेच होते, भोकर चे अध्यक्ष पद रिकामे न ठेवता ते तात्काळ भरण्यात यावे यासाठी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्याकडे भेटी देण्यावर जोर दिला होता तसेच इतर लोकांना सोबत घेऊन अध्यक्षपदाची माळ माझ्याच गळ्यात पडावी म्हणून अनेकांनी आपली शक्ती पणाला लावली होती तरीसुद्धा अध्यक्षपद हे भरण्यात आले नव्हते, आता नांदेड जिल्हा परिषद निवडणूक आणि आगामी भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भोकर चे तालुकाध्यक्ष निवडीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून येत्या 10 जून रोजी अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे त्या अनुषंगाने भोकर शहर वगळता खेड्यापाड्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डिंग लावली असून अध्यक्ष पद माझ्याच गळ्यात पडावे यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुद्धा लगेबाजी करत असल्याचे चित्र तालुक्यांमध्ये दिसून येत आहे.
■ अध्यक्ष खेड्याचा असावा - जनतेतून होत आहे मागणी.
भोकर काँग्रेसचा भावी दिला जाणारा तालुकाध्यक्ष हा जनतेच्या मागणीनुसार खेडयातूनच निवडला जावा आणि तो इतर मागासवर्गीय (obc) समाजाचा असावा अशी मागणी होतांना दिसून येत आहे. तसेच शहराध्यक्ष हा शहरातील नागरिक देण्यात येऊन तो सर्वसामान्य प्रवर्गातील असावा (open) अशी जनतेमधून मागणी होताना दिसून येत आहे.
जनतेच्या ह्या मागणीचा काँग्रेस पक्षश्रेष्ठी कितपत विचार करते हे पाहनेच सध्या योग्य ठरेल.
0 Comments