रमेश गंगासागरे
कन्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी आयोजित केलेला कृतज्ञता सोहळा आणि स्नेह संमेलन हा कार्यक्रम अविस्मरणीय असून माझ्या जिवनातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे उदगार माजी शिक्षक शेख आर.एम. सर यांनी काढले, ते भोकर येथील 1991-92 च्या माजी विद्यार्थी बांधवांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
सदरील कार्यक्रम भोकर येथे दि.29 मे 2022 रोजी रविवारी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विद्यार्थी बसवराज देशमुख यांच्या शेतात निसर्गाच्या सानिध्यात दुपारी पारपडला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक श्री, विजापुरे सर होते, कार्यक्रमास श्री, आठवले सर, कांबळे सर, निलावार मॅडम, दरबस्तवार सर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी तथा त्वचारोग तज्ञ प्रल्हाद राठोड यांनी केले, त्यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली, कार्यक्रमात आठवले सर, कांबळे सर, निलावार बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर अबरार ईनामदार मुंबई यांनी केले, तर आभार बसवराज देशमुख यांनी मानले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी अस्मिता लोणे, सुरक्षा व दक्षता अधिकारी नागपूर, संगीता शेटे शिक्षिका, वनिता घोडेकर, संजय कुलकर्णी, सुचिता संदानशीव, सरला संदानशिव, संगीता कुलकर्णी, अनिल वाघमारे, दिपक पाटील, सुधाकर देशमुख, अनिस, लक्ष्मन बहीरवाड, संजय सोनाळे, दंडे, प्रताप मैड, यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.
0 Comments