भोकर :(दि.27 मे )
रमेश गंगासागरे
वर्ल्ड व्हिजन सेवाभावी संस्था भोकर तहसीलमध्ये गेल्या दशकापासून कार्यरत आहे. आज वर्ल्ड व्हिजन कार्यालयात चार लाभार्थ्यांना प्रत्येकी 15,000/-किंमतीचे शिलाई मशीन आणि ब्युटी पार्लरचे साहित्य वर्ल्ड व्हिजन ने अमोल धनराज पवार, तालुका शिवसेना प्रमुख व स्वप्नील रेड्डी, तालुका शिवसेना युवाप्रमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप केले. लाभार्थी मीराभाई जाधव, जयश्री बुधवाड, संगीता भुडावड, पूजा जाधव हे जकापूर आणि जकापूर तांडा येथील रहिवासी आहेत.
भोकर वर्ल्ड व्हिजनचे मॅनेजर श्याम बाबू पट्टापू यांनी त्यांच्या संस्थेच्या सेवा समजावून सांगितल्या आणि नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. अमोल धनराज पवार म्हणाले की, लाभार्थ्यांनी आधाराचा उपयोग करून आपल्या जीवनात पुढे यावे व टिकावे तसेच गावातील वर्ल्ड व्हिजन सेवांचे कौतुक केले आणि त्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वप्नील रेड्डी यांनीही लाभार्थींना त्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. रतीलाल वळवी, शिरीष कांबळे आणि प्रकाश फुलझेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी सहकार्य केले. वर्ल्ड व्हिजन मॅनेजर श्याम बाबू पट्टापू यांनी पाहुणे आणि लाभार्थींचे आभार मानले.
0 Comments