भोकर :(दि.27 )
रमेश गंगासागरे
नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्या आपत्तीचा सामना कशाप्रकारे करावयाचा यासंदर्भात भोकर तहसीलच्या सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली भोकर तालुक्यातील सर्व विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10:30 वाजता च्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षी भोकर तालुक्यातील दोन ते तीन गावांमध्ये ओढ्याला पूर आल्यामुळे नागरिक आणि महिला वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या तर काही ठिकाणी वीज पडून नुकसान झाले होते, अशा नैसर्गिक परिस्थितीमध्ये सरकारी मनुष्यबळ कमी असतानाही उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांनी जीवाची पर्वा न करता ओढ्याला आलेल्या पुरामध्ये उडी मारून नागरिकांना वाचवले होते, यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, तसेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारे परिस्थितीचा सामना करता येईल या संदर्भामध्ये आज सर्व विभागाची महत्वपूर्ण बैठक पार पडली, यामध्ये सर्व विभागांना जागरूक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून प्रशिक्षित 25 ते 30 कर्मचारी यांची एक टीम बनविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली, हे टीम सर्व परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज असणार आहे, सदरील बैठकीमध्ये तहसीलदार श्री लांडगे, पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, बाल विकास प्रकल्पच्या जोशी मॅडम, ग्रामसेवक संघटनेचे कर्मचारी, सरपंच संघटनेचे कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments