मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ईसवी सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षात लागू होणारी स्वाधार योजना आणि शिष्यवृत्ती अद्याप पर्यंत मिळाली नसल्याने शहरी भागात राहणारे अनेक विद्यार्थी रूम भाडे देणे होत नसल्याने गावी परतले आहेत, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे, म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, राष्ट्रीय कांग्रेस परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून विद्यार्थ्यांना शिकण्याची नवी उभारी देऊन बळ द्यावे असेही दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, अन्यथा संबंध महाराष्ट्रभर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे भोकर तालुका अध्यक्ष श्री रमेश गंगासागरे, राष्ट्रीय काँग्रेस परिवाराचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री विजय कुमार मोरे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे भोकर तालुकाध्यक्ष संदीप कुमार गंगासागरे यांनी दिला आहे, यावेळी विविध संघटनेचे कार्यकते उपस्थित होते.
0 Comments