भोकर :(दि.23 मे )
  रमेश गंगासागरे
            माहेरच्या शेत जमिनी मध्ये टाकलेल्या प्लॉटिंग मध्ये आम्हाला हे सर्व वाटून दे असे म्हणून सासुरवाशीण असलेल्या एका महिलेस उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या हिंगोली येथील अब्दुल बारी अब्दुल बासीद, अब्दुल बासीद अब्दुल सत्तार, सायरा बेगम अब्दुल बासीद, अब्दुल साबेर अब्दुल सत्तार,  रुबीना बेगम अब्दुल साबेर, सोहेल अब्दुल बासीद त्यांच्याविरुद्ध भोकर पोलिसांमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी महिलेचे माहेर भोकर बिलाल नगर येथिल असून तिचे हिंगोली येथील अब्दुल बारी यांच्या सोबत 2016 रोजी भोकर येथे विवाह झाला त्यांच्यापासून त्यांना एक मुलगी असून संसार काही वर्ष सुखात चालला का नंतर सासरच्या लोकांनी माहेरच्या जागेवर नजर ठेवली त्या जागेतील आम्हाला दे म्हणून तिचा छळ सुरू केला व तिला उपाशीपोटी ठेवू लागले एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तू काळी आहेस दिसायला चांगली नाहीस असे म्हणून तिचा मानसिक छळ सुद्धा सुरू केला आहे, त्यामुळे शेवटी दोन्ही पक्षाकडून अनेक बैठका व तडजोडीसाठी झाल्या पण सदरील बैठकीमध्ये काही ठोस निर्णय झाला नाही, नाईलाजाने शेवटी सासरच्या मंडळी विरुद्ध भोकर ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम 498, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.