भोकर,: (दि.21 मे ) 
रमेश गंगासागरे
 तालुक्यातील खडकी हे गाव पाणीदार करण्यासाठी अनेकांचे योगदान मिळत आहे. दि. २१ मे रोजी झालेल्या दुसऱ्या महा श्रमदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चारशे जणांनी अडीच तास काम करत सीसीटी चे खोदकाम केले. श्रमदान व लोकसहभागातून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामा मुळे भविष्यात खडकी चे नदी नाले उन्हाळ्यात पाण्याने भरून वाहणार आहेत.
             राज्य तेलंगणा सीमेवर असलेल्या खडकी गावाकडे सर्वच बाबतीत दुर्लक्ष झाले होते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात येथे अधिग्रहण करावे लागत होते. सिंचन क्षेत्र ही तोडके आहे. येथील ग्रामस्थांचे आर्थिक उत्पन्न तेवढे नसल्याने माणसांच्या वाट्याला गरीबी आलेली. हे गाव पाणीदार व स्मार्ट व्हावे यासाठी सेवा समर्पण परिवार, प्रशासन यांनी मागील ३६ दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे गाव सुंदर होत असताना दररोज श्रमदान करून कधी माती नाला बांध मधील गाळ काढणे तर कधी सीसीटी चे खोदकाम करून पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी खडकी येथे श्रमदान करून या श्रमदानाला वेग देण्याचे काम केले आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे यांचे मोठे योगदान लाभत आहे. दि २१ मे रोजी खडकी येथे दुसऱ्यांदा महा श्रमदान आयोजित करण्यात आले होते. या महा श्रमदानात उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे भोकर व मुदखेड तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, सेवा समर्पण परिवार चे सदस्य, ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी यासह चारशे जणांनी अडीच तास श्रमदान करून सीसीटी चे खोदकाम केले. 
           पन्नास दिवस चालणाऱ्या या श्रमदान यज्ञामुळे आणि लोकसहभागातून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामामुळे खडकी हे गाव पाणीदार होणार आहे. भविष्यात येथील नदी नाले उन्हाळ्यात पाण्याने भरून वाहणार आहेत. 
       【 पन्नास दिवस चालणाऱ्या या श्रमदान दररोज खडकी चे ग्रामस्थ व सेवा समर्पण परिवार घाम गाळत आहे. दोन वेळा झालेल्या महा श्रमदानातून अनेक माणसं श्रमदानासाठी जोडल्या गेले आहेत. दि ५ जून रोजी या श्रमदानाचा समारोप होणार आहे. तरीही पुढील तीन वर्षे सेवा समर्पण परिवार येथे काम करणार असून हे गाव रोल मॉडेल म्हणून पुढे यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत】