भोकर :(दि.20 मे )
माळरानाच्या कुशीत वसलेल्या खडकी येथे मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी टंचाई असायची. यामुळे अधिग्रहण करून गावकऱ्यांची तहान भागवली जात असे. हे कुठे तरी थांबावे यासाठी सेवा समर्पण परिवार, प्रशासन व ग्रामस्थांनी ने पुढाकार घेतला असून मागील ३५ दिवसांपासून दररोज येथील मातीत हजारो हात कामाला लागले आहेत. या श्रमदानाला आणखी गती मिळावी यासाठी दि २१ मे रोजी पुन्हा एकदा महा श्रमदान आयोजित करण्यात आले आहे.
भोकर तालुक्यातील खडकी गाव पाणीदार व्हावे यासाठी दि १६ एप्रिल पासून श्रमदान करण्यात येत आहे. या श्रमदानात सेवा समर्पण परिवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, खडकी चे ग्रामस्थ दररोज तीन तास श्रमदान करतात. दि ३० एप्रिल रोजी खडकी येथे महा श्रमदान आयोजित करण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा महा श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. २१ मे रोजी होणाऱ्या या महा श्रमदानात उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी अमित राठोड, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते, यासोबत खडकी येथील ग्रामस्थ, सेवा समर्पण परिवार, भोकर व मुदखेड तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी कार्यालयातील कर्मचारी, वन विभाग, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका हे सहभागी होणार आहेत. सकाळी ६ पासून या श्रमदानाला सुरुवात केली जाणार आहे.
मागील ३५ दिवसात माती नाला बांध मधील गाळ काढण्याचे काम व सी सी टी चे काम करण्यात आले आहे. हे काम ५१ दिवस चालणार असून दि ५ जून ला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ३०० वृक्षलागवड करुन या श्रमदानाची सांगता होणार आहे.
0 Comments