भोकर :(दि.2 मे 2022)
     रमेश गंगासागरे

         माहिती मिळण्यासंदर्भात भोकर नगरपरिषदेला अनेकवेळा निवेदने आणि माहितीचा अधिकार देऊनही उत्तर मिळत नसल्याने शेवटी कंटाळून येथील कंत्राटी सफाई कामगार महिलेने आज दि.2 मे पासून भोकर नगर परिषदेच्या विरोधात तहसील कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
       उपोषणाला आज भेट दिली असता असे समजले की, सदरील उपोषणकरती महिला श्रीमती कांताबाई तानाजी सोनसळे ह्या भोकर येथील ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हापासून रोजंदारी कामगार म्हणून कामावर होत्या, त्यांच्यासोबतच्या ईतर कर्मचाऱ्याना नगर परिषद अस्तित्वात आल्यावर कायमस्वरूपी पदावर घेण्यात आले, तेव्हापासून इतर कर्मचारी आज पर्यंत काम करत आहेत,  पण सदरील उपोषणकरत्या या महिलेस आजपर्यंत कायम (परमनंट) करण्यात आले नाही, ह्या संदर्भात उपोषणकर्त्या या महिलेने अनेक वेळा भोकर नगरपरिषदेला लेखी विचारणा करूनही नगरपरिषद काहीच प्रतिसाद देत नसल्याने शेवटी आज सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून भोकर तहसील कार्यालयाच्या पुढे भर उन्हामध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असल्याने सदरील महिलेस तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.