भोकर: ( दि.1 मे 2022 )
भोकर येथे ता. ४ मे २०२२ रोजी सांयकाळी ६ वाजता, वादळवारा फेम, " अनुरुद्ध वनकर यांच्या बुद्ध- भीम " गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे धम्म विचार मंच', जुना मोढां भोकर, येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख गट नेते विधान परिषद आमदार अमर राजुरकर हे उपस्थीत रहाणार आहेत तर याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक वक्ता प्रा जोग्रेद्रं कवाडे ( माजी खासदार तथा आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष ), युवा वक्ता क्षितीज कांबळे बोरगावकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पी. एम. तोडे, उपविभागीय अधिकारी राजेद्र कंधारे, आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी उपस्थिती लाभणार आहे, या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष साहेबराव मोरे , संयोजक देवा हटकर यांनी केले.
0 Comments