नांदेड (दि.8 एप्रिल )
  रमेश गंगासागरे

     नांदेड येथील एका शातिर चोराने नामी शक्कल लढवून पोलिसांना व गाडी मालकाला चकमा देण्यासाठी युक्ती लढवली असून एका व्यक्तीच्या गाडीचे नंबर प्लेट दुसऱ्याच्या गाडीला लावून चालवत असल्याचे नांदेड येथे आढळून आल्यावरून नांदेड सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत सविस्तर तक्रार देण्यात आली असून पोलिस आरोपी शातीर चोराचा शोध घेत आहेत.
       घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेड येथील नगीना घाट भागात राहणाऱ्या एका आरोपीने राजस्थान बडोदा येथील टँकर मालक नामे केशरसिंग गुरुदेवसिंग बेगल यांच्या टँकरचा क्रमांक दुसऱ्या एका ट्रकला लावून बिनधास्तपणे नांदेड शहर आणि परिसरामध्ये गाडी चालवत असल्याचे त्यांना आढळून आले, यावरून नंबर प्लेटचा मूळ मालक केशरसिंग बेगल यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली असून तक्रारीमध्ये म्हटले आहे की, नांदेड शहरातील नगीना घाट भागातील  एक नागरिक त्यांच्याकडे बडोदा राजस्थान येथे काही दिवसापूर्वी कामावर होता, त्याचे वर्तन व चाल चलन त्यांना आवडले नसल्यामुळे त्यांनी त्यास कामावरून काढून टाकले, त्यामुळे त्याने नांदेड शहरांमध्ये येऊन ईतर कोणाच्या तरी संशयित ट्रकाला त्यांच्या गाडीचा क्रमांक लावला आणि नांदेड शहरात मागील 03 महिन्यांपासून तो बिनधास्तपणे फिरत आहे. आरोपीने काही गुन्हा केल्यास अथवा अपघात घडवून आणल्यास बडोदा राजस्थान येथील मूळ केशरशिंग बेगल या मालकाला गृहित धरण्यात आले असते, ही परेशानी होऊ नये म्हणून बडोदा राजस्थान येथील सदरील क्रमांकाचा मूळ मालक केशरसिंग बेगल याने सावध होऊन गुन्हा घडण्यापूर्वी वेळीच दि.6 एप्रिल 2022 रोजी पोलिसांना आवश्यक सर्व पुराव्यानिशी लेखी स्वरूपात कळविले असून पोलिस आता सदरील आरोपीचा शोध घेत असल्याचे कळते. आरोपी पकडल्या गेल्यास त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणपत गीते हे अधिक तपास करत आहेत.