रमेश गंगासागरे
भोकर येथील कॉम्प्युटरचे प्राथमिक शिक्षण देणारी संस्था दिशा कम्प्युटर एज्युकेशनचा एम. एस. सी. आय. टी. जानेवारी 2022 चा निकाल 100 टक्के लागला असून यात 90 ते 97 टक्के पर्यंत गुण घेऊन अनेक विद्यार्थ झळकले आहेत, तर याच संस्थेचा विद्यार्थी आकाश राजेना आंबेटवाड याने 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
दिशा कम्प्युटर एज्युकेशन ने अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षका मार्फत कम्प्युटरचे पूर्वप्राथमिक ज्ञान देऊन त्यांना स्वयंभू केले आहे. त्यामुळे भोकर तालुक्यामध्ये ही संस्था आता नावारुपास आलेली दिसून येत आहे. या संस्थेचा आकाश आंबेटवाड हा भोकर तालुक्यातील सोनारी येथे राहणारा असून तो शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबद्दल दिशा कम्प्युटर एज्युकेशनचे संस्थाचालक एम.व्ही. गायकवाड, मिर्झा सर, गामोड सर, एच.एम. गायकवाड सर आणि सुमन फुलझेले यांनी त्याचे संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. ह्यापूर्वी सुद्धा ह्या संस्थेमधून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शंभर पैकी शंभर गुण मिळवून संस्थेचे व आपले नाव उज्ज्वल केले आहे तसेच 90 ते 98 टक्के पर्यंतचे शेकडो विद्यार्थी सुद्धा याच संस्थेने घडवले आहेत हे विशेष.
0 Comments