रमेश गंगासागरे
संजय बियाणी यांचे मारेकरी आणि त्याच्या पाठीमागे कोण व्यक्ती आहेत, त्यां सर्वांना येत्या 5 दिवसाच्या आत शोधून काढुन कडक कार्यवाही करावी अन्यथा नांदेड बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याची प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांनी संजय बियाणी यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात दिली, पुढे बोलतांना ते म्हणाले की, नांदेड पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असून सामान्य लोकांना रस्त्याने चालणे कठीण जात आहे. नांदेड पोलीस कशात मग्न आहे कळत नाही, यापूर्वी सुधा त्यांना कानाला बंदूक लावून लुटण्यात आले होते, त्या आरोपींचे काय झाले? त्यांना पोलीस संवरक्षण होते ते कशामुळे काढले,?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, आपल्या नांदेड मध्ये अश्या प्रकारे भयानक खून होतात, हे व्हिडीओ पाहून मी सुद्धा रात्रभर झोपलो नाही गुन्हेगार कोणी असो त्यांचे पाठीराखे कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना मुळीच दया दाखवली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नांदेड येथील त्यांच्या शारदानगर भागातील निवासस्थानासमोर दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यानी संजय बियाणी यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला, यातच त्यांचा करून अंत झाला.
आज दि.6एप्रिल रोजी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवास्थानापासून सकाळी 11 वाजता निघाली, अंत्ययात्रेत हजारोचा जनसमुदाय उपस्थित झाला होता. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये संजय बियाणी यांचा मृत देह ठेवण्यात आला होता. दुपारी त्यांची अंत्ययात्रा गोवर्धन घाट येथे पोहोचली त्यावेळी श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक आमदार खासदार मंत्री सरपंच नातेवाईक मित्रमंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments