नांदेड (प्रतिनिधी )

   नांदेड येथील कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची सध्या कारागृह प्रशासनाकडून हेळसांड होत असल्याने तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.       येथिल कारागृहात सध्या जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या गुन्ह्यातून आलेले अनेक कच्चे कैदी बंदिस्त  आहेत, त्यांना भेटण्यासाठी लांब वरून दररोज अनेक नातेवाईक या ठिकाणी येत असतात,  भेटण्यासाठी आलेल्या रक्ताचे नातेवाईक जसे काका, काकू, चुलत भाऊ, चुलत बहीन, आजी, आजोबा, मामा, भासा यांना कारागृह प्रशाशन भेट घडवून आणत नसल्याने दूरवरून आलेले अनेक नातेवाईक कारागृह प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत. तसेच ईथे भेटीसाठी तासन तास बसलेल्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नातेवाईकाना भटकंती करावी लागत आहे. तर पाणपोई असलेला बोर्ड नावापुरताच उरला असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना काळ नसतांनाही नातेवाईकाना लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, जे प्रतिक्षागृह आहेत, ते सदा सर्वदा बंद असल्याचे या वेळी दिसून आले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी लक्ष पुरवून नातेवाईकाना भेटू द्यावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, तसेच बसण्यासाठी शेड टाकून आत मध्ये बाके ठेवावीत, लसीच्या प्रमाणपत्राची अट रद्द करावी अशी मागणी कैद्याच्या नातेवाईकांकडून होत आहे.