खाद्य तेल, पेट्रोल, गॅस आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून यास केंद्र सरकार जबाबदार असून सर्वसामान्य माणसाला या महागाई मुळे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आज दि.4 एप्रिल रोजी तालुका व भोकर काँग्रेसच्या वतीने भव्य रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सदरील रॅली आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्यापसून निघून तहसिल कार्यालयापुढे येऊन विसर्जित झाली, रॅलीला जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी संबोधित केले, रॅलीत वा रे मोदी तेरा खेल,, सस्ती दारू महंगा तेल, नरेन्द्र मोदी हाय,,हाय ,, महागाई कमी झालीच पाहिजे अश्या प्रकारचे नारे देण्यात आले, या रॅलीचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री,नागेलीकर यांनी केले, रॅलीत भोकर व तालुक्यातील अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते.
0 Comments