भोकर :(दि.25 एप्रिल )
    रमेश गंगासागरे

   भोकर परिसरात अंदाजे 35 वर्षे वय असलेल्या एका विवाहित महिलेचा मृत देह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
       घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, भोकर रेल्वे स्टेशन परिसरातील ही महिला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून तिच्या अंगावर नवीन लाल रंगाची साडी दिसत आहे, सदरील महिला उमरी रोडवरील गिट्टी मशिनच्या  परिसरात मृत  अवस्थेत आज दि.25 एप्रिल रोजी सकाळी दिसून आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
      सकाळची घटना असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोकर ठाण्यात सदरील घटनेबाबत कसल्याच प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती त्यामुळे सदरील महिलेच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात असून याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही