नांदेड :(रमेश गंगासागरे)
     नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड यांचा सिडको येथील नागरिकांच्या वतीने सोमवारी रात्री भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
       नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गुंड वावरात असून अशा गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सध्या ग्रामीण पोलिस करतांना दिसून येत आहे  शनिवारी कौठा भागातील एका नामांकित गुंडाला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि त्यांची टीम गेली असतात तेथील गुंड यांनी पोलीस शिपाई पाटील आणि इतर एका पोलिस कर्मचाऱ्यांवर तलवारीचे वार करुन जखमी केले,  तसेच तो आणखीन मोठ्या हल्याच्या तयारीत असतानाच पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी त्या गुंडाला थांबण्याच्या सूचना केली, पण तो गुंड काही ऐकत नव्हता, त्यांनी पोलीस गाडीची ही नासधूस केली, त्यामुळे शेवटी सूचना देऊनही न ऐकणाऱ्या गुंडाच्या पायाला त्यांनी गोळी मारून जखमी केले आणि त्याच्या मुसक्या आवळून अटक केली, त्यामुळे पोलीस निरीक्षक घोरबांड आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
       बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेक व्यापाऱ्यांनी पोलिसावर नाराजी व्यक्त करून गुंडांना तात्काळ पकडून शासन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत लिस्ट वर असणाऱ्या गुंडांना तपासण्यासाठी पथके स्थापन करण्यात आले आहेत, अश्याच ऐका पथकावर गुंडांनी तलवारीने हल्ला चढवला होता, पण प्रसंगावधान राखून पोलिस निरीक्षक घोरबांड यानी गोळीबार करून हा हला परतवून लावला. त्यामुळे सिडको येथिल नागरिकांच्या वरीने सोमवारी रात्री त्यांचा व त्यांच्या टीमचा  गौरव करून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक नागरिक व महिलांची उपस्थिती होती.
       सत्काराला उत्तर देत असताना पोलिस निरीक्षक घोरबांड म्हणाले की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसून कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. आंबेडकर जयंती शांततेत आणि हर्ष उल्हासात साजरी करावी. सध्या रमजान महिना चालू असून कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या सर्वांना मी कायद्याचा इंगा दाखवणार असल्यामुळे कायदा भंग करणाऱ्यांनी सावध राहावे, असे ते यावेळी म्हणाले मंचावर अनेक पोलिस कर्मचारी बांधवांची उपस्थिती होती.