नांदेड :(1एप्रिल )
    प्रतिनिधी
    बाल विकास प्रकल्प कार्यालय ना. प्र. क्र. ३ नांदेड अंतर्गत दि. २१ मार्च २०२२ ते ०४ एप्रिल २०२२ पर्यन्त पोषण पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोषण पंढरवाड्या अंतर्गत प्रकल्पातील कार्यरत १३३ अंगणवाड्यामध्ये पोषण विषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत १) जलसंवर्धनात  महिलांची भूमिका २) अँनिमिया प्रतिबंध  व उपचार  ३) पारंपरिक आहाराचे महत्व  या बदल प्रचार व प्रसार करण्यात आला. आज दि. ०१ एप्रिल २०२२ रोजी मा. बालविकास प्रकल्प अधिकारी श्री मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी नगर तरोडा (बु. ) येथे प्रकल्पाअंतर्गत गरोदरमाता, स्तनदामाता, किशोरीमुली, व सर्व अंगणवाडी सेविका, आणि मदतनीस यांची अँनेमिया तपासणी शिबीर हाल हिंद लॅब यांच्या सहकार्यांने करण्यात आली. आज रोजी झालेल्या शिबीरामध्ये ९९ गरोदर महिला, ५४ स्तनदामाता, १०५ किशोरीमुली व प्रकल्पातील ११० सेविका व मदतनीस यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी लाभार्त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यालयाच्या मुख्यसेविका श्रीमती वैशाली मेघमाळे, श्रीमती सुषमा शिसोदे यांनी मार्गदर्शन केले . तसेच तपासणीसाठी हाल हिंद लॅबचा कोओर्डीनेटर श्रीमती सिंधू वासंमवार, मा. जमालोदिन, एस. के . वसिमोडीनं, प्रीतम धुळे, प्रज्ञा कदम यांच्या सहकार्याने करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले.